- हरि ॐ -

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे.
तुम्ही माझ्या "तहानलेले मनमाड" या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल
धन्यवाद.
तहानलेले मनमाड ? वाचायला थोडे विचित्र वाटले ना ? तहानलेले तर समजले पण मनमाड काय आहे ?
तर मित्रहो, मनमाड हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. अंदाजे दोन लाख लोकसंख्या आहे.
मनमाड हे राज्यातील दुस-या क्रमांकाचे रेल्वे जंक्शन आहे. दररोज ९० ते १०० मेल, एक्सप्रेस, मालगाड्या या जंक्शन वरुन वर्दळ करतात. मनमाडहुन दिल्ली, मुंबई, जम्मु-काश्मीर, पुणे, भुसावळ, औरंगाबाद-हैद्राबाद, कोकण, शिर्डी, सोलापुर पर्यंत रेल्वे सेवा आहे. भारतातील क्रमांक २ चा केंद्रिय रेल्वे तांत्रिक कारखाना मनमाडला आहे. येथे रेल्वेच्या ओव्हर ब्रिजेसला लागणारे गर्डर तयार होतात. अंदाजे २००० लोक या कारखान्यात काम करतात. २००५ साली या कारखान्याला १०० वर्ष पुर्ण झाले. भारतीय खाद्य निगम(FCI), हे अशिया खंडातील दुस-या क्रमांकाचे व भारतातील पहिल्या नंबरचे धान्य साठवण्याचे गोडाउन आहे. भारत पेट्रोलियम, हिन्दुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या महत्वाच्या तेल कंपन्यांची साठवणुक मनमाडला आहे. मुंबईहुन मनमाडला विषेश पाइप लाइनद्वारे रॉकेल, पेट्रोल, डिझेल व गॅस येतो आणि देशातील विविध राज्यात याचा पुरवठा केला जातो. भारतातील तिस-या क्रमांकाचा शिख - गुरुद्वारा मनमाडला आहे. दर पोर्णिमेला हजारो शीख भाविक विविध राज्यातुन दर्शनाला येतात. तसेच सुमारे ७००-१०००० वर्षाचा इतिहास असलेले अंकई व टंकई हे दोन किल्ले आहेत. जैन धार्मिक लेणी व शंकराच्या काळ्या दगडात कोरलेल्या मुर्ती येथे आहेत. अगस्ती ‌ऋषींचे मंदीर येथे आहे.
एवढी मोठी ख्याती असलेलेले हे शहर मागील ४० वर्षापासुन पाण्यासाठी तहानलेले आहे.
मनमाड सारख्या महत्वाच्या शहरात महिन्यातुन एकदा पाणीपुरवठा होतो व या विषयाला कुणीच गांभीर्याने घेत नाही याची खंत म्हणुन, मनमाड मधील नैसर्गिक, भौगोलिक, ऎतिहासीक, राजकिय गोष्टीना अनुसरुन मनमाडमधील पाण्याचा दुष्काळ चित्ररुपी जगासमोर मांडण्याचा हा ब्लॉग आणि फ़ेसबुकच्या माध्यमातुन केलेला छोटासा प्रयत्न !
प्रशांत रोटवदकर.

Sunday, September 9, 2012

A Thirst Manmad ची दखल घेतली दै. महाराष्ट्र टाइम्सने दि. २५ मे २०१२ नाशिक टाइम्स. धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स, विक्रम जोर्वेक्र, सचिन अहिरराव 

No comments:

Post a Comment