तहानलेले मनमाड ? वाचायला थोडे विचित्र वाटले ना ? तहानलेले तर समजले पण मनमाड काय आहे ?तर मित्रहो, मनमाड हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. अंदाजे दोन लाख लोकसंख्या आहे.
मनमाड हे राज्यातील दुस-या क्रमांकाचे रेल्वे जंक्शन आहे. दररोज ९० ते १०० मेल, एक्सप्रेस, मालगाड्या या जंक्शन वरुन वर्दळ करतात. मनमाडहुन दिल्ली, मुंबई, जम्मु-काश्मीर, पुणे, भुसावळ, औरंगाबाद-हैद्राबाद, कोकण, शिर्डी, सोलापुर पर्यंत रेल्वे सेवा आहे. भारतातील क्रमांक २ चा केंद्रिय रेल्वे तांत्रिक कारखाना मनमाडला आहे. येथे रेल्वेच्या ओव्हर ब्रिजेसला लागणारे गर्डर तयार होतात. अंदाजे २००० लोक या कारखान्यात काम करतात. २००५ साली या कारखान्याला १०० वर्ष पुर्ण झाले. भारतीय खाद्य निगम(FCI), हे अशिया खंडातील दुस-या क्रमांकाचे व भारतातील पहिल्या नंबरचे धान्य साठवण्याचे गोडाउन आहे. भारत पेट्रोलियम, हिन्दुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या महत्वाच्या तेल कंपन्यांची साठवणुक मनमाडला आहे. मुंबईहुन मनमाडला विषेश पाइप लाइनद्वारे रॉकेल, पेट्रोल, डिझेल व गॅस येतो आणि देशातील विविध राज्यात याचा पुरवठा केला जातो. भारतातील तिस-या क्रमांकाचा शिख - गुरुद्वारा मनमाडला आहे. दर पोर्णिमेला हजारो शीख भाविक विविध राज्यातुन दर्शनाला येतात. तसेच सुमारे ७००-१०००० वर्षाचा इतिहास असलेले अंकई व टंकई हे दोन किल्ले आहेत. जैन धार्मिक लेणी व शंकराच्या काळ्या दगडात कोरलेल्या मुर्ती येथे आहेत. अगस्ती ऋषींचे मंदीर येथे आहे.
एवढी मोठी ख्याती असलेलेले हे शहर मागील ४० वर्षापासुन पाण्यासाठी तहानलेले आहे.
मनमाड सारख्या महत्वाच्या शहरात महिन्यातुन एकदा पाणीपुरवठा होतो व या विषयाला कुणीच गांभीर्याने घेत नाही याची खंत म्हणुन, मनमाड मधील नैसर्गिक, भौगोलिक, ऎतिहासीक, राजकिय गोष्टीना अनुसरुन मनमाडमधील पाण्याचा दुष्काळ चित्ररुपी जगासमोर मांडण्याचा हा ब्लॉग आणि फ़ेसबुकच्या माध्यमातुन केलेला छोटासा प्रयत्न !
प्रशांत रोटवदकर.
Sarvapratham Prashant Rotwadkaranche Hardik abhinandan anni Abharahi... karan ki te jya Manmad shaharache Far Purvi Rahivashi Hote tya Manmad shaharat asalelya Bhishan Panitanchaichi zal tyanna Nashik madhe Janavate. Mhanajech Tyana vatnari Manmad kiva tya shaharat rahanarya lokanvishaichi talmal aapan lakshat ghetali pahije.Aaj Tyani Manmadcha pani prashna jya Nishthene mandala aahe tyala aapan nishitach salaam kela pahije.Karan Aashi Kititari Gave V shahare aapalya Bharatat aahet.Ya Dware Tyani Ajun ek sandesh aaplya saravana dila aahe ase mala vatate aani to mhanache PANI VACHAVA. Thanks Prashant.
ReplyDeleteDeepak Kale
I am fan of you blogs like
ReplyDeleteस्वातंत्र्यसमर १८५७ चा, 1857 war memories gallery, Shreemant Peshwe,प्रेम आणि प्रेमाच्या कविता, चारोळ्या ......and this u r unique blog!
Congratulations for your efforts hope it will come out with solutions.
I hope through this blog at least some light will thrown on this neglected problem which is important one for Manmadkar pepole....how they are living there life?...may through this blog your request to Government will take a new mode of "Panyachi Kranti"!!!!!!!!!!!!!!!
All the Best!
Prashantche Prathamta Abhinandan....,
ReplyDelete"घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी" ya ukti pramane prashant jya gavat (shaharat) wadhla tya gavachi panyasathichi van-van balpanapasun tyani bhaghitli mhanunach bal vayat bhagitlele panya sathi che dukh aaj hi to visru shakla nahi manunach tyne nashikla rahun blog chya madhyamatun kelela ha pramanik prayatna..
Prayatnana lavakarach yash milo hi sadicha !!
Thank
Ranjeet
Prashant, Nehami pramane best presentation skills
ReplyDeleteAll the Best
Mohan Wankhede.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
ReplyDeletePrashant, Tahanlele Mammad Blog che Presentation Best Ahe.
ReplyDeleteYa Blog baghun tari Sarkarnre Manmad Pani Prashna Sodvava.
Tujya prayatnana Yash Milo Hi Sadicha...
All The Best
Sumant B.
Prashant is a great job done on net
ReplyDeleteU have to collect all this friend who join u and do something for the thirsty "manamad" so it becomes Human Made GOds place on earth
"All the Best"
Regards
Rajesh
Prashant , Tumcha blog aavdala. tumchya hya bhagirath praytnanna yash milo aani ganga tumchya dari yevo. ...
ReplyDeleteThanks Sulakshana.
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteABP माझा ने घेतलेल्या ब्लाग माझाच्या पहिल्या पर्वात "स्वातंत्र्यसमर १८५७ चा" http://swatantrasamar1857cha.blogspot.in या ब्लागची उत्तेजनार्थ निवड झाली होती. आता चौथ्या पर्वात परत "तहानलेले मनमाड "http://athirstymanmad.blogspot.in/ या ब्लागची उत्तेजनार्थ निवड झाली.
धन्यवाद.
प्रशांत रोटवदकर.